Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली

शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली



नांदेड : खरा पंचनामा

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देवाग कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची फोडल्याची घटना समोर आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे आज एका लग्न कार्यासाठी देगाव कुराडा येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची गाडी पार्किंगमध्ये लाऊन ते लग्न कार्यात गेले, तेव्हा ही घटना घडली आहे. दरम्यान, मराठा आंदोलकानी त्यांची गाडी फोडल्याची चर्चा सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क करून ते कार्यक्रमात गेले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली आहे. मराठा आंदोलकानी आमदारांच्या कारची काच फोडल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र नेमकं हे कृत्य कुणी केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.