'त्या' राजकीय माननीयांची पोलिस सुरक्षा काढली!
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहरातील विविध पक्षांचे राष्ट्रीय स्तरावर असलेले अध्यक्ष, प्रमुख तसेच नगरसेवक व वेगवेगळ्या महत्वाच्या व्यक्ती आणि काही ठिकाणांना व स्थळांना पुणे पोलिसांकडून पुरविलेली 'पोलीस सुरक्षा' (गार्ड) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढून घेण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्तांच्या आणखी एका वेगळ्या निर्णयाने पुन्हा शहरभर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांनी राजकीय माननियांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर अनेकांनी फोना-फोनी सुरू केल्याचे चित्र पहायला मिळाले.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात मोठ्या प्रमाणात महत्वाच्या तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती राहतात. त्यासोबत संवेदनशील ठिकाणे देखील आहेत. पुणे पोलिसांकडून अशा व्यक्तींना पोलीस सुरक्षा पुरविली जाते. त्यासोबतच जिवातास धोका आहे, अशा व्यक्तींनाही सुरक्षा पुरविली जाते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर सुरक्षेबाबत निर्णय घेणाऱ्या कमिटीची बैठक घेत आढावा घेतला. त्यानंतर मोठा निर्णय घेत बहुतांश जणांची सुरक्षा काढून घेण्याचा आदेश दिला आहे. एकीकडे कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण पडत आहे. आता या निर्णयामुळे तब्बल साडे तीनशे पोलीस कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.
शहरातील मोक्का सारख्या गुन्ह्यात तक्रारदार तसेच साक्षीदार असणाऱ्या चौघांची पोलिस सुरक्षा पोलीस आयुक्तांनी सुरू ठेवली आहे. शहरात आता केवळ २५ व्यक्तींनाच पोलिस सुरक्षा आहे. ज्यामध्ये महत्वाचे व्यक्ती तसेच त्यांच्या जिवाला धोका निर्माण आहे, अशा व्यक्तींचा समावेश आहे.
पुणे शहर पोलिसांनी एकूण ११० जणांना पोलिस सुरक्षा पुरवली होती. त्यातील ८५ जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांचे सुरक्षा गार्ड देखील काढण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.