Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयात नवा बनावट कागदपत्र स्कॅम; उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सहभाग

मंत्रालयात नवा बनावट कागदपत्र स्कॅम; उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सहभाग



मुंबई : खरा पंचनामा

मंत्रालयात नवा बनावट कागदपत्र स्कॅम उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणात मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयानं किशोर भालेराव यांना निलंबित केलं आहे. कोणतीही सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता, भालेराव यांनी बनावट आदेशपत्र जारी केल्याचं, चौकशी अहवालात उघड झालं आहे.

दरम्यान अनेक संवेदनशील गुन्ह्यात, विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशोर भालेराव यांच्यासह विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल यांचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे.

गँगस्टर छोटा शकील संबंधीत खटल्यात देखील ही बनावट कागदपत्रं वापरण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे बार काउन्सिलिंगकडे देखील ही कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. संजय पूनामिया यांच्या तक्रारीनंतर सदर कागदपत्रांची, पोलिसांकडून छाननी करण्यात आली. गृहमंत्रालयानं या प्रकरणाचा अहवाल मुंबई पोलिसांना दिला होता, गृहखात्याच्या अहवालात, प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं निष्पन्न झाल्यानं, पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाख केला आहे. IPC 170, 420, 465, 467, 468, 471,474 आणि 120B नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.