मुख्य सचिव नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
मुंबई : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव पदावर असणाऱ्या नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय निवडणूक आयोगाने स्वतःहून म्हणजेच राज्य सरकारने कुठलाही प्रस्ताव दिलेला नसताना घेतला आहे.
नितीन करीर हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार होते. मात्र आता त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत झाला आहे. नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिव पदावर 31 जानेवारी 2023 रोजी निवड जाहीर झाली होती आणि 1 जानेवारीपासून त्यांनी कामकाज सुरू केले होते.
कारण, तत्कालीन मुख्य सचिव मनोज सौनिक हे 31 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती केली गेली होती. 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
मुख्य सचिवांच्या नावाचा प्रस्ताव नसताना त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची ही राज्याच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून केवळ सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला गेला होता, मात्र निवडणूक आयोगाकडून तो फेटाळला गेला होता. त्यानंतर आयोगाने तीन नावे सुचवण्याचे आदेश दिले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.