Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बंद फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्यासह सराफाला अटक साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

बंद फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्यासह सराफाला अटक
साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा


सांगली शहरातील विविध ठिकाणचे बंद फ्लॅट फोडून त्यातील ऐवज चोरणाऱ्यास रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली. तसेच चोरट्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून चोरीचे साडेसात लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

सुनील नामदेव रूपनर (वय ३२, रा. कुपवाड), सुशील संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले आहे. पथक सांगली शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील बिरोबा नरळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील रूपनर हा सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असणाऱ्या एका अपार्टमेंटजवळ चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

त्यानंतर पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे सुनील रूपनर हा एका अपार्टमेंटसमोर थांबला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला एक हातोडी तसेच खिशात दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील अभयनगर, बालाजीनगर, होळकर चौक, विष्णू घाट आदी परिसरातील बंद फ्लॅट फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच ते दागिने सराफ सुशील आपटे याला विकल्याचे सांगितले. सुनील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे माहित असूनही त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी आपटे यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, संदीप नलवडे, उदयसिंह माळी, सागर लवटे, अमर नरळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.