Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डिपॉझिट म्हणून चिल्लर नाही चालणार!

डिपॉझिट म्हणून चिल्लर नाही चालणार!



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून येत्या महिन्याभरात राज्यात पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अशातच सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपापल्या परीनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणुकीचा फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून काही अटी शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडून 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्नवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

मराठी चित्रपट गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटात मकंरद अनासपुरे यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यासमोर ठेवली होती. त्यानंतर असे अनेक नारू खरोखरच्या निवडणुकीत प्रत्येकवेळी पाहायला मिळतात, मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नारूचा गोंधळ बंद होणार आहे. कारण निवडणूक आयोगानं आता उमेदवारांची अनामत रक्कम म्हणून चिल्लर रुपात केवळ एक हजार रुपयेच देता येतील असं थेट जाहीरच करुन टाकलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.