कवठेपिरानची सुरज पाटील टोळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील सुरज पाटील टोळीस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली.
सुरज संभाजी पाटील (वय २९) आणि अक्षय नामदेव पाटील (वय २७, दोघेही रा. कवठेपिरान, ता. मिरज) यांचा समावेश आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित सूरज पाटील टोळीने सन २०१७ ते २०२२ या कालावधीत दहशत निर्माण केली होती. खून करुन पुरावा नष्ट करणे, शिवीगाळ, मारहाण, गांजाची विक्री करणे, आदींसह अन्य गुन्हे टोळीतील दोन सदस्यांवर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.
प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी हा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्याकडे पाठविण्यात आला होता. सदर चौकशी अहवाल, टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्हयांचा अहवाल आदी विचारात घेवून पोलीस अधिक्षकांनी टोळीवर हद्दपारीची कारवाई केली.
यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरिक्षक सिध्दाप्पा रुपनर आदींसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.