सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही!
जालना : खरा पंचनामा
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणुका जाहीर करू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडायला सुरुवात करणार. सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेमध्ये आहे. त्यामुळे त्यांना सत्ता मिळू देणार नाही. मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली तर मराठा समाजाची सभा घेणार. ९०० एकरमध्ये ६ कोटी समाज बांधवांची सभा घेणार आहे. मुबंई, पुण्यासह अमरावती सोलापूर, बीड, उस्मानाबाद आशा ११ ठिकाणच्या जागांचा पर्याय आहे. यापैकी एक जागा अंतिम करणार, असे मनोज जरांगे म्हणाले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने सगेसोयरेच्या अंमलबजावणीची घोषणा करावी, अन्यथा निवडणूक पुढे ढकलावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर असताना सरकार आचारसंहिता कशी लागू करणार? मराठा समाजाला डावलून, त्यांचा अपमान करून सरकारने आचारसंहिता लागू करू नये, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समाजावर अन्याय करणार नाही याची आशा आहे. ओबीसीमधून सरकारनं आरक्षण दिलं तर मराठा समाज सत्ताधाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचणार, अन्यथा सत्ता मिळू देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाचे आंदोलन देशभर पसरणार आहे. निवडणुकांसाठी प्रत्येक गावातील १० उमेदवार अर्ज भरणार आहेत. गुजरात, हरियाणामध्येही मराठा समाजाच्या आंदोलनाचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. मी कोणाचा प्रचार करणार नाही, मी जनेतीची भावना मांडतो, शरद पवार उद्धव ठाकरेंची भाषा बोलत नाही. सर्व पक्षातील नेत्यांनी ३० दिवसांचा वेळ मागितला होता. यासाठी ठराव होणार होता, तो ठराव आता बाहेर पडेल. मराठा आंदोलन करत असताना झालेल्या घडामोडींची SIT चौकशी करण्यात आली. फडणवीस आधी म्हणाले होते मग आता SIT चौकशी का? निवडणूक सुरु झाली तर सगळे पत्ते बाहेर पडणार आता सरकार पुढच्या अडचणी वाढणार आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.