लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार
पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
पुणे : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने सत्ताधारी सरकारच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. मराठा सकल क्रांती मोर्चा व सकल समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भोईर व्यायामशाळा, चिंचवड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या वतीने सत्ताधारी सरकारच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या बैठकीसाठी मारूती भापकर, मनोहर वाडेकर, प्रकाश जाधव, सतीश काळे, जीवन बोराडे, धनाजी येळकर, नकुल भोईर, वैभव जाधव, वसंत पाटील, संजय जाधव, अभिषेक म्हसे, सचिन पवार, शिवाजी पाडुळे, गणेश देवराम, ब्रह्मानंद जाधव, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सतीश शेलार, संदीप नवसुपे, औंकार देशमुख, मोहन पवार, राज साळुंखे स्वप्नील परांडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने सगेसोयरेबाबतची अधिसुचना काढून आंदोलन स्थगित करायला लावले. अधिसुचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवल्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झआले. मात्र अधिसुचनेचे कायद्यात रूपांतर केले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.