आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध?
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार आणि इतर नेत्यांशी संबधित असलेल्या शिखर बँक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र या सुावणीदरम्यान ईडीने हस्तक्षेप करण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे. अद्याप कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळालेली नाही. मात्र १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी ईडीला याप्रकरणी परवानगी मिळाली तर ईडीकडून याप्रकरणी युक्तिवाद केला जाऊ शकतो. आणि मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाऊ शकतो.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होत आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी ईडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. 15 मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे. अजित पवार यांच्यावर याप्रकरणी आरोप झाले होते.
मुंबई पोलिसांच्या मूळ एफआयआरमध्ये अजित पवार आणि इतर नेत्यांची आरोपी म्हणून नावं होती. जवळपास २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप याप्रकरणी झाला आहे. मुंबई पोलिसांनी कुठलेही पुरावे उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र पहिला क्लोजर रिपोर्ट होता तो पुन्हा तपास करायचा आहे असे सांगत मुंबई पोलिसांनी मागे घेतला होता. त्यानंतर मागच्या महिन्यात पुन्हा एकदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र ईडीने यावर आक्षेप नोंदवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळाली तर ईडीकडून युक्तिवाद करताना या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. १५ मार्चला नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.