कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा, कोणता विषय नव्हता!
कोल्हापूर : खरा पंचनामा
उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. असं असलं तरी यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात एकमत झालं नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. यातच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले आहेत की, "सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा, कोणता विषय नव्हता. सांगलीत विशाल पाटील उभे राहीले तर ते निवडून येतील. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित करणं, हा त्यांचा निर्णय आहे. पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असं वाटतं."
शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर बोलताना सतेज पाटील म्हणाले आहे की, "शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. या सगळ्याचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे. आज विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 25 वर्षांनी काँग्रेस चिन्हासमोरील बटन दाबायला मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.