तुम्ही कोणत्या 'धरणा'तून 'सिंचन' करुन साम्राज्य उभं केलं?
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. ईडीने 50 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर पवार कुटुंबातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे.
रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये संघर्षयात्रा काढली होती. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिले असून तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या 'धरणा'तून 'सिंचन' करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? असा खणखणीत सवाल अजित पवार यांना केला आहे.
शनिवारी सकाळी रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका 'बच्चा'ने 800 कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी 'यांनी काय संघर्ष केला' अशी टीका काहींनी केली.
त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या 'मित्रा' बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या 'धरणा'तून 'सिंचन' करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.