Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात २१ लाखांचा गुटखा जप्त सातारा जिल्ह्यातील एकाला अटक, विटा पोलिसांची कारवाई

विट्यात २१ लाखांचा गुटखा जप्त
सातारा जिल्ह्यातील एकाला अटक, विटा पोलिसांची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

गुहागर-विजापूर मार्गावर विट्याजवळ एका पिकअप जीपमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिकअप जीप, प्रतिबंधित गुटखा असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विटा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.  

ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २२, रा. दारूज, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगलीतील पोलिस सजग झाले आहेत. गुहागर-विजापूर रस्त्यावरून एका पिकअपमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होता.  

विटा पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक पिकअप जीप (एमएच ११ डीडी ४३९०) पथकाला दिसली. पथकाने गाडी थांबवून गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीतील पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याच्या पुड्या सापडल्या. याबाबत कदम याच्याकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून गाडीसह त्यातील गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शेंडकर, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, महेश संकपाळ, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, विशाल पवार, नीरज बारपत्रे, कॅप्टन गुंडवाडे, श्रीधर बागडी, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.