मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून अन् दोन साथीदारांना घेऊन!
मुंबई : खरा पंचनामा
एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारवादावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. राज्याचं राजकारण सुरुवातीला ३० कुटुंबाभोवती फिरत होतं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
मी पुन्हा येईन हे केवळ एक वाक्य नव्हतं. मी कशासाठी येईन, हे देखील मी सांगितलं होतं. पण, लोकांनी ते एकच वाक्य प्रसिद्ध केलं. मी पुन्हा येईल असं म्हणालो होतो. त्यानुसार मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो आहेच, पण, त्याचबरोबर दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना घेऊन आलोय, असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नसती तर भारताचं विभाजन झालं नसतं. काँग्रेस नसती तर देशात भ्रष्टाचार झाला नसता. राजकीय नेत्यांचे मुलं-मुली राजकारणात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. पण, त्यांनी स्वतः च्या हिंमतीवर यावं. हक्क म्हणून येऊ नये. नेहरुच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्व करेल असं ठरलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं कारण तेच आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐनवेळी आपल्या मुलीच्या हातात पक्ष दिला, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. यासाठी विचारधारा सोडायला देखील तयार होते. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादाची ऑर्डर तोडण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत. केवळ कुणाचा मुलगा किंवा मुलगी असल्याने राजकारणात स्थान मिळणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.