महाराष्ट्रातल्या महामार्गावर खासगी बसवर फिल्मी स्टाईल गोळीबार
अमरावती : खरा पंचनामा
एका धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार झाला आहे. अगदी चित्रपटात दाखवतात तशा प्रकारची ही घटना आहे. त्यामुळे महामार्गावरुन प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा जवळ रात्री उशिरा ही घटना घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन एक खासगी प्रवासी बस नागपूरच्या दिशेने चालली होती.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बोलेरोने खासगी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने धडाधड गोळ्या चालवल्या. या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा जवळ रात्री उशिरा 12 च्या सुमारास ही घटना घडली. हा गोळीबार का करण्यात आला गोळीबार करणारे कोण होते? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.
पहाटे पर्यंत पोलिसांनी या भागात नाकाबंदी लावली होती. गोळीबारात जखमी झालेल्या प्रवाशांना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन दररोज हजारो वाहन जात असतात. या घटनेमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीच वातावरण आहे. कारण गोळीबार व्यक्तीगत कारणातून झाला की, लुटमारीच्या उद्देशाने ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.