Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अंबाबाई मूर्तीची पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी अहवाल न्यायालयात होणार सादर

अंबाबाई मूर्तीची पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
अहवाल न्यायालयात होणार सादर



कोल्हापूर : खरा पंचनामा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची काल दुसऱ्या दिवशीही पुरातत्त्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी पाहणी केली. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या केमिस्ट विभागाचे निवृत्त उपअधीक्षक विलास मांगीराज व सेवानिवृत्त मॉड्युलर आर. एस. त्र्यंबके यांनी ही पाहणी केली.

यामध्ये गाभाऱ्यातील हवामान, उष्णता, आर्द्रता या हवामान विषयक बाबींची त्यांनी माहिती घेतली. या पाहणीचा अहवाल चार एप्रिलपूर्वी न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तत्पूर्वी २२ मार्चला तो सादर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी सात ते दहा यावेळेत मूर्तीची पाहणी झाली. यामध्ये देवीची नित्य पूजा कशी होते, अभिषेकामध्ये कोणते घटक असतात, तो कसा घातला जातो, या बाबींचीही श्रीपुजकांकडून या निवृत्त अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

दरम्यान, या पाहणीची गुरुवारपासून सुरुवात झाली असून, काल पाहणीचा दुसरा दिवस होता. श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने ती सध्या नाजूक स्थितीत आहे. मूर्तीचे संवर्धन केले जावे, असा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.