Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनसेला आपल्या कोट्यातून जागा देण्यास भाजपचा नकार

मनसेला आपल्या कोट्यातून जागा देण्यास भाजपचा नकार



मुंबई : खरा पंचनामा

महायुतीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. २१ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, या चर्चेत भाजप राज ठाकरे यांना आपल्या कोट्यातून लोकसभेची जागा देण्यास भाजपने नकार दिल्याचे समजते.

मुंबईत आज एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सुमारे दीड तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या. यावेळी भाजपने राज ठाकरे यांना आपल्या कोट्यातून जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून मनसेला जागा देण्यात याव्यात, अशीही चर्चा झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबाबतची अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.