Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' दारू विक्रेत्यांच्या जामिनदारांच्या मालमत्तेवर चढणार ५० हजारांचा बोजा मिरज प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय; उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांची माहिती

'त्या' दारू विक्रेत्यांच्या जामिनदारांच्या मालमत्तेवर चढणार ५० हजारांचा बोजा
मिरज प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय; उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांची माहिती



सांगली ः खरा पंचनामा

वारंवार कारवाई करूनही तसेच चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र देऊनही हातभट्टी, गावठी दारूची अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार दारू विक्रेत्यांच्या जामिनदारांच्या मालमत्तांवर प्रत्येकी पन्नास हजारांचा बोजा चढवण्याचा आदेश मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.  

सूरज प्रकाश कुंभारमारवाडी (रा. कुपवाड रोड, मिरज), चेतन प्रकाश कुंभारमारवाडी (जयहिंदनगर, मिरज), स्वाती रामदास नाईक (रा. कवलाई गल्ली, कवलापूर), आकाराम नामदेव खाडे (रा. कवलापूर) अशी त्या दारू विक्रेत्यांची नावे आहेत. या सर्वाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) नुसार वारंवार गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली होती. वारंवार कारवाई करूनही चौघेही सातत्याने अवैधरित्या हातभट्टी आणि गावठी दारूची विक्री करत होते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ९३ नुसार कारवाईसाठी मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. 

त्यानंतर चौघांकडूनही सहा महिन्यांसाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्रही घेण्यात आले होते. परंतु त्यांनी बंधपत्राचे उल्लंघन करून अवैध दारू विक्री सुरूच ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रांताधिकारी श्री. दिघे यांनी चौघांच्याही जामिनदारांच्या मालकीच्या मालमत्तेवर प्रत्येकी पन्नास हजारांचा बोजा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.