Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनोज जरांगेंनंतर काँग्रेस नेत्याची इलेक्शन खेळी गडकरींच्या नागपुरात मोठा प्लॅन !

मनोज जरांगेंनंतर काँग्रेस नेत्याची इलेक्शन खेळी
गडकरींच्या नागपुरात मोठा प्लॅन !



नागपूर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणूक आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, ही मागणी सातत्याने फेटाळली जात असल्यानं आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमने नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेच्या एका मतदारसंघात 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम संघटनेच्यावतीने नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी 400 उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती माजी मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. ईव्हीएमच्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत.

सुनील केदार म्हणाले, की ईव्हीएमच्या वापराने निकाल फिरविता येत असल्याने मतदानावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. वारंवार तक्रारी करून देखील निवडणूक आयोग त्याची दखल घेत नाही. देशातील निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्ष आणि पारदर्शी असणं आवश्यक असताना निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचंही ते म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच अधिकाधिक उमेदवार उभे करण्याचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या या निर्णयानंतर निवडणूक यंत्रणेवरील ताण वाढण्याची चिन्हं आहेत.

सर्वसामान्य जनतेचा अधिकाधिक सहभाग असताना मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जावी याकडे लक्ष वेधण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा हा लढा आहे. सर्वसामान्य जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हायला हवं, अधिकाधिक मतदान करायला हवं, असं आवाहन यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.