५ उमेदवारांना बदलण्याच्या भाजप हायकमांडने दिल्या शिंदे सेनेला सूचना...!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांची कोंडी होतेय का असा प्रश्न आता निर्माण होतोय कारण शिवसेनेच्या ५ खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेच्या ५ उमेदवारांना त्यांच्या बदलाच्या सूचना मिळाल्या आहेत तर भाजप हायकमांडकडून शिंदेना सुचना मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
मिशन ४५ च्या अनुशंगाने महायुतीकडून जोरदार प्रयत्न सध्या महाराष्ट्रात होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने राज्यातील खासदारांच्या मतदारसंघात जे सर्वे करण्यात आले होते. त्यामध्ये शिवसेनेचे आताचे जे ५ खासदार आहेत त्यांचे सर्वे हे निगेटीव्ह आल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे याठिकाणी नवा चेहरा द्यावा किंवा कुठेतरी बदल करण्यात यावा, अशा सूचना भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदेंना देण्यात आल्या आहेत.
भावना गवळी, गजानन कीर्तीकर, लोखंडे, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय. अंतिम निर्णय आता एकनाथ शिंदे यांना घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. भाजपचं शिंदेंवर हे दबावतंत्र सुरु असल्याचंही बोललं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.