Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल आवाडे महाविकास आघाडीत जाणार, हातात घेणार 'मशाल'?

राहुल आवाडे महाविकास आघाडीत जाणार, हातात घेणार 'मशाल'?



कोल्हापूर : खरा पंचनामा

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत ते 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आवाडे महाविकास आघाडीत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन निवडणुकांपासून आपण तयारी करतोय; पण, प्रत्येकवेळी वरिष्ठांकडून थांबवले जाते. किती दिवस दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचे? आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही जागा लढवायची ठरविली तर प्रसंगी त्यांची मशाल हातात घ्या; पण, निवडणूक लढवा, असा दबावच पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्यावर आणला.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार लक्षात घेत येत्या दोन दिवसांत (शनिवारपर्यंत) वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू, असा शब्द आमदार आवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय पवार यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.