केजरीवाल मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार
चेन्नईहून आलेले ४५ कोटी 'आप'ने गोव्यात प्रचारासाठी वापरले; ED कडून युक्तिवाद
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर त्यांना आज शुक्रवारी (दि.२२) साउथ अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने सुनावनीदरम्यान केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू यांनी आज न्यायालयात ईडीची बाजू मांडली. अरविंद केजरीवाल हेच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली. गुरुवारी रात्री ९.०५ वाजता केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज दिला आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू न्यायालयासमोर सांगितले. यावेळी राजू यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सेंथिल बालाजी प्रकरणाच्या निकालाची प्रत न्यायालयाला दिली. त्यांनी निकालातील संबंधित परिच्छेद वाचून दाखवले.
अरविंद केजरीवाल हेच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचा थेट सहभाग असल्याचा युक्तिवाद राजू यांनी केला. विजय नायर केजरीवाल यांच्या घराशेजारील घरात राहत होते. ते आम आदमी पक्षाचा मीडिया प्रभारी होते. त्यांनी (विजय नायर) आम आदमी पक्ष आणि दक्षिण गट यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.