SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा डेटा पाठवला...
नवी दिल्ली : खरा पंचनामा
निवडणूक रोख्यांप्रकरणी काल (सोमवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी झासी. ही सुनावणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर होतीच ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आली होती.
त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने कठोरता दाखवत SBI ने उद्याच (मंगळवार) बाँडशी संबंधित सर्व माहिती द्यावी आणि निवडणूक आयोगाने १२ मार्चपर्यंत ती प्रसिद्ध करावी, असे सांगितले.
भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांचा डेटा आज मंगळवार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.