Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत 26 लाखांची 41 किलो चांदी जप्त

सांगलीत 26 लाखांची 41 किलो चांदी जप्त



सांगली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तब्बल ४१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. सांगलीवाडी टोल नाक्यावरील नाकाबंदीत जप्त करण्यात आलेल्या या दागिन्यांची किमत २५ लाख ९२ हजार रुपये असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी दिली आहे. विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.

आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलिस आणि इतर कर्मचाऱ्‍यांची संयुक्तीक पथके तयार करुन नाकाबंदी केली जाते. या नाकाबंदीत मोठ्या रकमेची किंवा अन्य मौल्यवान वस्तूंची विनापरवाना वाहतुक केली जात असेल तर कारवाई केली जाते. याच पार्श्‍वभूमीवर आज शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास सांगलीवाडी येथील टोलनाक्यावर विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची होत असलेली वाहतुक समोर आली. या नाक्यावर कार (एमएच १० सीए ८६३०) तपासण्यात आली. 

यावेळी देवेंद्र बाबुलाल माळी (रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) हे विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतुक करत असल्याचे उघडकीस आले. या दागिन्यांबाबत निवडणुक आयोगाने सांगली जिल्ह्यासाठी स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे आणि सेवा व वस्तूकर अधिकाऱ्‍यांना अहवाल देण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.