Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात 280 कोटींचा अॅडव्हान्स...."

"अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात 280 कोटींचा अॅडव्हान्स...."



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात मोठा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर आता पवारांनी नवा आरोप केला आहे. त्यानुसार, अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात २८० कोटींचा अॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवारांनी ट्विट करत ही नवी माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्याच्या आरोग्य विभागाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असलेल्या अॅम्बुलन्स घोटाळ्यात 'मोठ्या खेकड्या'ने नांग्या मारण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यात पुरवठादारामार्फत २८० कोटींचा अॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न केला, परंतू पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचं आधीच पोस्टमॉर्टेम केल्यानं अधिकाऱ्यांनी 'आता लगेचच नको' असं सांगत नकार दिल्याचं कळतंय.

दिवसाढवळ्या डोळ्यादेखत हा घोटाळा होत असताना केवळ मोठे खेकडे सहभागी असल्यानं सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी गप्प असले तरी आम्ही मात्र यात सहभागी सर्व खेकड्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही. अधिकाऱ्यांना विनंती आहे, या घोटाळ्यात भागीदार होऊ नका अन्यथा खूप महागात पडेल. सरकारनंही ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा जनताही सरकारच्या नांग्या ठेचायला मागं-पुढं पाहणार नाही, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.