देशभरातील मद्यांच्या किमतीत आजपासून वाढ, सरकारला मिळणार 45 हजार कोटी रुपये
नवी दिल्ली : खरा पंचनामा
आजपासून देशात सर्व प्रकारच्या मद्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने मद्यप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच नवे उत्पादन शुल्क धोरणही लागू झाले आहे. त्यामुळे देशी, इंग्रजी बिअर या तिन्ही प्रकारच्या मद्यांच्या दरात वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांतील सरकारने मद्याचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यांनी याबाबतच्या सूचना मद्य ठेकेदारांनाही सूचना पाठवल्या आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नवीन उत्पादन शुल्क धोरण 2023-24, 29 जानेवारी रोजी मंजूर करण्यात आले. मोदी मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे.
नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार देशातील मद्य परवाना शुल्क 10 टक्क्यांनी वाढले आहे. अबकारी दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून देशात सर्व प्रकारच्या मद्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी जून २०२२ मध्ये दारूचे दर वाढले होते. आता दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा दर वाढले असून त्याची अंमलबजावणी आज १ एप्रिलपासून करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.