वाळू तस्करी करणारे हायवा, लोडर, ट्रॉलीसह एक ट्रॅक्टर जप्त
47 लाखांचा मुद्द्यमाल जप्त; चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
गोदावरी नदीपात्रात सुरळेगाव येथे वाळू भरण्यासाठी आलेले एक ट्रॉली सह ट्रॅक्टर व लोडर तसेच हाइवा डंपर असा 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागल्याने या वाहनांचे चालक पळून गेल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली.
श्री. एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गोदावरी नदीपात्रात सुरळेगाव या ठिकाणी एक वाळू भरण्यासाठी वापरले जाणारे लोडर तसेच ट्रॉली सर ट्रॅक्टर हे वाळू भरणे कामी येणार आहे. त्याप्रमाणे ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सापळा रचून छापा टाकला असता एक ट्रॉली सह ट्रॅक्टर व लोडर मिळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ट्रॅक्टर व लोडर वरील ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रॅक्टर व लोडर जागीच जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर व लोडर चालक मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.
त्यादरम्यान सुरळे गावाकडे जात असताना विना नंबरचा एक हायवा डंपर राक्षस भवन ते सुरळेगाव रस्त्यावरती रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने मध्येच उभा राहिलेला मिळून आल्याने तो ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
चकलांबाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल खटाणे, पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल पवळ, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, चालक सानप आदींनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.