Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

98 निवडणुका हरला पण बहाद्दर खचला नाही! लोकसभेसाठी दोन जागांवर उमेदवारी अर्ज भरून केली 100 व्या निवडणुकीची तयारी

98 निवडणुका हरला पण बहाद्दर खचला नाही!
लोकसभेसाठी दोन जागांवर उमेदवारी अर्ज भरून केली 100 व्या निवडणुकीची तयारी



आग्रा : खरा पंचनामा

सलग काही वेळेला राजकीय आखाड्यात पराभवाला सामोरे गेल्यानंतर थेट राजकीय संन्यास घेण्याबाबत सल्ले दिले जातात. मात्र जर एखादा उमेदवार 98 वेळा हरूनही 100 व्या वेळेस हरण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहे. आग्रा जिल्ह्यातील खेरागड येथील हसनुराम आंबेडकर यावर्षी 100 व्या वेळेला हरण्यासाठी तयार आहेत.

हसनुराम आंबेडकर हे बहुजन समाज पक्ष अस्तित्वात येण्यापूर्वी ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांनी सन 1985 पासून निवडणुका लढविण्यास सुरुवात केली. पहिली निवडणूक त्यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात लढवली. ही निवडणूक उत्तर प्रदेश विधानसभेची होती. मात्र पहिल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही.

मात्र त्यांनी निवडणूक लढविणे सुरूच ठेवले. त्यांनी आजवर सुमारे 39 वर्षांच्या कालावधीत 98 निवडणुका लढवल्या. त्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना अपयश मिळाले. तरी देखील त्यांनी यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. आग्रा आणि फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

दोन्ही ठिकाणी आपल्याला पराभव मिळू शकतो. तरी देखील आपण उमेदवारी दाखल केली आहे. कारण आपण लोकांना एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करतो. आपला 100 निवडणुका लढवण्याचा मानस असून यानंतर निवडणुका लढवणार नसल्याचे आंबेडकर सांगतात.

हसनुराम आंबेडकर यांनी ग्रामपंचायत पासून ते विधानसभा आणि लोकसभे पर्यंतच्या जवळपास सर्वच निवडणुका लढवल्या आहेत. सन 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना सर्वाधिक 36 हजार मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रपती पदासाठी देखील उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.