ईडीकडून राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची 98 कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : खरा पंचनामा
ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा यांचे मुंबई, पुण्यातील फ्लॅट आणि 98 कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत.
मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी (दि.18) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असेलल्या जुहू येथील निवासी फ्लॅट, पुण्यात असलेला निवासी बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर इक्विटी शेअर्स अशा एकूण 97.79 कोटी मालमत्तेचा समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अनेक एफआयआरच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली आहे. ज्यामध्ये राज कुंद्रावर लोकांकडून बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे खोटं आश्वासन देऊन निधी गोळा केल्याचा आरोप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.