सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत ४३ क्रशर सील
महसूल विभागाची मोठी कारवाई, गुंडागर्दी केल्यास कुणालाच सोडणार नाही : जिल्हाधिकारी
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
महसूल विभागाने जिल्ह्यातील सर्व खाणींची माहिती घेत अनाधिकृत ४३ केशर बंद केले असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच वडूज परिसरात अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा गंभीर असून यापुढे कोणत्याही विभागात असे कृत्य झाल्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली जाईल, गुंडागर्दी करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्यास कोणालाच सोडणार नाही असा थेट इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात २४३ क्रशर सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर कायदेशीर तपासणी करण्यात आली त्यामध्ये अनाधिकृत ५७ क्रशर आढळून आले. त्यापैकी १४ केशर नियमित करण्यात आले आणि उर्वरित ४३ क्रशर बंद करण्यात आले आहेत. वडूज परिसरात बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. तलाठी व मंडलअधिकारी संबंधित ठिकाणी जावुन डंपर जेसीबीवर कारवाई केली. मात्र संबंधित लोकांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना मारहाण केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुंडागर्दीं करुन भ्याड हल्ले केल्यास कोणालाही सोडणार नाही संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, सातारा जिल्हा शांतताप्रिय आणि क्रांतीकरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुंडागर्दी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, सर्व विभागांनी निर्भयपणे आपले कामकाज करावे. चुकीचे काही सुरू असल्यास कारवाई झालीच पाहिजे. अनाधिकृत धंदे बंद करावेत अन्यथा गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा देखील सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.