सांगलीतील सात अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
कोल्हापूर जिल्ह्यातील १४ तर सातारा जिल्ह्यातील ९ जणांचाही समावेश
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सांगलीतील सात अंमलदारांसह कोल्हापूर जिल्ह्यातील १४ तर सातारा जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने शुक्रवारी तब्बल ८०० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील अनिल सूयर्वंशी, शरद माने, महेश जाधव या सहायक पोलिस उपनिरीक्षकांसह हवालदार सागर लवटे, संजय माने, राजेंद्र पाटील आणि पोलिस नाईक संदीप नलावडे आदींचा समावेश आहे. हे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १ अधिकारी, ५ सहायक पोलिस उपनिरीक्षक, ८ हवालदार, एक पोलिस शिपाई यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील २ अधिकारी, ५ सहायक पोलिस उनिरीक्षक, २ हवालदार, दोन शिपाई यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.