Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

.तर विशाल पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे

.तर विशाल पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांची जोरदार चर्चा होतेय. सांगली मतदारसंघातील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. आता संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील अन् विशाल पाटील या तिघांमध्ये लढत होत आहे. अशात विशाल पाटलांवर पक्षाची शिस्त मोडल्याची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. जर कुणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढणार असेल. भाजपला मदत व्हावी म्हणून मग ती व्यक्ती काम करत असेल. तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झाली पाहिजे. शेवटी कोणत्याही व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.