"यांना इतक्या ताकदीनं पाडा की.", मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन
देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख !
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षण व आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपर्यंत अर्थात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत जर सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, तर आपण पुन्हा उपोषण करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्याशिवाय, आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू आणि सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी असल्याचं नमूद केलं आहे.
"देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम"
यावेळी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला. “देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. माता-माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे. पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत", असं ते म्हणाले.
"मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं, पाडण्यातही मोठा विजय आहे. पाडा यांना. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं. यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. महायुतीनं आम्हाला फसवलं आहे. सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीयेत. समाजाला बरोबर कळलंय कुणाच्या विरोधात मतदान करायचंय. मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीयेत. निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.