उपमुख्यमंत्री पुत्र पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा!
पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत असताना महायुती सरकारचा निर्णय
पुणे : खरा पंचनामा
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. राजकीय नेत्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारने त्यांना थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलात मोठ्या मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील 'प्रतिष्ठित' व्यक्तींची सुरक्षा काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे पुण्यातील 85 व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. असे असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सुरक्षा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.