दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
साडेपाच लाखांच्या १० दुचाकी जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरज शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आणून साडेपाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
निखील महेश मागाडे (वय २४, रा. अभयनगर, सांगली), आयान समीर भिस्ती (वय २०, रा. जुना कुपवाड रोड, सटाले मळा, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना सांगलीतील चिन्मय पार्क परिसरात दोन तरूण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने चिन्मय पार्क परिसरात सापळा रचला होता. तेथे दोघेजण संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने आयान भिस्ती, शाहीद मुल्ला यांच्या मदतीने सांगली आणि मिरज शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील चोरीच्या दहा दुचाकी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. दोघांनाही मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, राजेश माने, अरूण पाटील, सचिन धोत्रे, अमर नरळे, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, अजय बेंद्रे, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकोडे, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.