Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

... तर राज्यातील नागरिकांना कुत्री कापून खावी लागतील

... तर राज्यातील नागरिकांना कुत्री कापून खावी लागतील



यवतमाळ : खरा पंचनामा

कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

यवतामाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

या आधीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. खासकरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना पडळकरांनी टोकाचे शब्द वापरल्याचं दिसतंय. आताही त्याच प्रकारचं वक्तव्य केल्याने त्यावरून राजकीय वाद होतो का हे पाहावं लागेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.