सांगलीवाडीत पूर्ववैमनस्यातून तरूणाचा खून
मध्यरात्रीची घटना, संशयित पसार
सांगली : खरा पंचनामा
सांगलीवाडी येथे पूर्ववैमनस्यातून एका तरूणाला मध्यरात्री घरातून बाहेर बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. हारूगडे प्लॉट परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तरूणाच्या घराजवळच राहणाऱ्या एकाविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर नामदेव कदम (रा. हारूगडे प्लॅट, सांगलीवाडी) असे संशयिताचे नाव आहे. प्रतिक भिमराव गायकवाड (वय २१, रा. हारूगडे प्लॉट) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रमिला भिमराव गायकवाड (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री प्रतिक जेवण करून घरात बोलत बसला होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास संशयित किशोर कदम याने त्याला काम असल्याचे सांगत घरातून बाहेर बोलावले.
प्रतिक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या प्रतिकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातील तसेच शेजारचे लोक धावत तेथे आले. त्यावेळी किशोर तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत प्रतिकची आई प्रमिला यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित किशोर कदम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करू असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खाडे अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.