एलसीबीच्या पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
धुळे : खरा पंचनामा
प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मगून दीड लाख रुपये लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस हवालदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.1) रात्री करण्यात आली. एसीबीच्या कारवाईमुळे धुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे (रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड), पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे), अशोक साहेबराव पाटील (वय 45 रा. प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षाय व्यक्तीने धुळे एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून ही रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी पोलीस हवालदार मोहने व पाटील यांच्यासोबत चर्चा करुन तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत एसीबी कार्यालयता जाऊन तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम पोलीस हवालदार यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती ठरलेली दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.