Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेजवळ सुगंधी तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ७.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

मिरजेजवळ सुगंधी तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक 
७.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज-बंडग रस्त्यावर अवैधरित्या प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मालवाहतूक जीपसह ७.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

जयेश महिपती भगत (वय २९, रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव), हेमंत श्रीकांत वरुडे (वय ३२, रा. ब्राह्मण गल्ली, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुटखा, दारू यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक गस्त घालत असताना मिरज बेडग रस्त्यावरून एका मालवाहतूक जीपमधून गुटखा, सुगंधी तंबाखू याची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्या‌द्वारे मिळाली.

पथकाने मिरज-बेडग रस्त्यावर सापळा लावला होता. त्यावेळी या रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ एक मालवाहतूक जीप (एमएच १० बीआर २६६०) उभी असल्याचे दिसून आले. पथकाला जीपमधील लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकानें जीपमधील चालक आणि एकाकडे चौकशी केली. नंतर जीपची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगधी तंबाखू, गुटख्याची पाती आढळून आली. याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुटखा कर्नाटकातील कुडची येथून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करून जीपसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही मिरज ग्रामीण पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकदर वर्धन, हणमंत लोहार, आमसिद्ध खोत, संजय कांबळे, बाबासाहेब माने, अमर नरळे, अजय बेंद्रे, कॅप्टन गुंडवाडे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.