महाविकास आघाडीचा तिढा सुटला! अंतिम जागावाटप जाहीर
सांगलीतुन शिवसेनेचे चन्द्रहार पाटील निश्चित
मुंबई : खरा पंचनामा
आज मुंबईत महाविकास आघाडीती पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर केला. लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.
महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या 17 जागा :
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा :
बारामती, शिरुर, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण.
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा :
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य, पालघर, कल्याण, मावळ, धाराशीव, हातकणांगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.