Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा



पुणे : खरा पंचनामा

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे.

याबाबत 33 वर्षीय युवतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिस उपनिरीक्षक किरण माणिक महामुनी (वय 38) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना तिची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरात नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. 

हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.