"आखिर कहना क्या चाहते हो?"
दमानियांचा राज ठाकरेंना सवाल
नाशिक : खरा पंचनामा
मनसेचा पाडवा मेळावा मंगळवारी पार पडला. यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी एनडीएला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. पण आता त्यांच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केलं आहे. आखिर कहना क्या चाहते हो? असा सवाल राज ठाकरेंना केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, "राज ठाकरेंचं भाषण जर आपण ऐकलं तर ते सैरभैर झालेले दिसले. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली. नोटाबंदीवर बोलले, रोजगार नाही यावर बोलले. एकीकडं बोलले मोदींचं काम ठीक नव्हतं म्हणून २०१४-१९ मध्ये मी टीका केली. मला खुर्ची नको होती त्यातच ते मध्येच एखादा टोला उद्धव ठाकरेंनाही मारत होते."
यामध्ये ते फक्त आपल्या भूमिकांचं जस्टिफिकेशन देत होते. मध्येच त्यांनी मीडियावर एक टोमणा मारला. जसं राज ठाकरे एरव्ही बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. त्यांच्या भाषणात काही कॉमेडी असते तसंही त्याचं नव्हतं. ते गोंधळलेले वाटत होते त्यामुळं मी भाषणानंतर ट्विटही केलं होतं की, आखिर कहना क्या चाहते हो. त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हेच लोकांना कळेना, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
एवढ्या लांबून त्यांचे कार्यकर्ते काल आले होते पण त्यांचं भाषण पहिल्यांदाच अगदी छोटसं भाषण झालं. हे भाषण ऐकून मनसेचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील. पण काल त्यांनी भाजपला पाठिंबा दिला पण आधीच ते दोन- तीन वेळी म्हणाले की, राजकारणातील व्याभिचाऱ्याला राजमान्यता देऊ नका.
पण त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळं त्यांच्या मागे ईडीचं चक्र होतं म्हणूनच त्यांनी पाठिंबा दिला का? अशा प्रश्नही मनात येतो. पण हा बिनशर्त पाठिंबा देताना कारण काहीच नव्हतं. कारण तुम्हाला लोकसभेची खुर्ची नाही, राज्यसभा नाही. तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. इतकं काही सध्या लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.