यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक
यवतमाळ : खरा पंचनामा
यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने ही दगडफेक केली आहे.
यवतमाळ-वाशिम महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेला उदय सामंत देखील हजर होते. यावेळी एका अज्ञाताने त्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला, सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. पोलिसांनी अद्यापही कुणाला अटक केली नाही. पण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
यवतमाळ-वाशिम येथील शेतकरीबहुल मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या पाचवेळा खासदार भावना गवळी यांना हटवून त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ-वाशिमची लढत चांगलीच तापली आहे. त्या कुणबी समाजाच्या असून हिंगोलीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत.
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत आहे. संजय देशमुख हे शिवसेनेचे (UBT) उमेदवार आहेत. काँग्रेस आपली पारंपारिक मुस्लिम, दलित व्होटबँक आपल्या मित्रपक्ष शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवाराकडे हस्तांतरित करू शकते की नाही यावरही निकाल अवलंबून असेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.