सख्ख्या भावावर चाकूहल्ला करणाऱ्यास अटक
सांगली : खरा पंचनामा
घरगुती वादातून सख्ख्या लहान भावावर चाकूने खुनीहल्ला करणाऱ्या मोठ्या भावाला अटक करण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
किसन विठोबा कारंडे (वय ४५, रा. हनुमाननगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पारूबाई विठोबा कारंडे यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घरगुती वादातून किसन याने लहान भाऊ रामा याच्याशी वाद घातला. त्यावेळी किसनने रामा याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात रामा गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित विठोबा कारंडे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला. विश्रामबागचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी कुंभार, संदीप कांबळे, मारूती साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संदीप घस्ते, संकेत कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.