राजारामपुरीतील सराईत गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
कोल्हापूर : खरा पंचनामा
खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दंगा करणे, गंभीर दुखापत, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरीतील सराईत गुन्हेगाराला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.
श्रीमंत वसंत गवळी (वय ४५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे हद्दपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. गवळी याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दंगा करणे, गंभीर दुखापत, दरोडा असे १९ गंभीर गुन्हे राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
त्या प्रस्तावाचे अवलोकन करून त्यावर सुनावणी घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी श्रीमंत गवळी याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याला हद्दपार करण्यात आले आहे.
राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक विकास अडसूळ, अरविंद पाटील, सुशांत तळप आदींनी या कारवाईत भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.