महिलांवरील वक्तव्यावरुन नेत्यांना नोटीस
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात अचारसंहिता लागू आहे.
या कालावधी अशाप्रकारे महिलांना अपमानास्पद बोलणे हे आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या कारवाईवरून भारतीय निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक भाषणात सावध राहण्याचा इशारा देखील निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांना दिला आहे.
यावेळेपासून आयोगाकडून महिलांवरील अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या निवडणुकीशी संबंधित भाषण आणि संवादांवर विशेष लक्ष ठेवले जाईल, असे देखील स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.