Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'बंडखोरी, गद्दारी होत असेल तर...'

'बंडखोरी, गद्दारी होत असेल तर...'



मुंबई : खरा पंचनामा 

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप आणि एनडीएला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही एकत्र आली आहे. मात्र, सांगलीच्या जागेवरून सुरू झालेला वाद हा अद्यापही शमलेला नाही. त्यामुळेच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या (16 एप्रिल) पत्रकार परिषदेत एकप्रकारे आपला संताप व्यक्त करत थेट काँग्रेसलाचा सुनावलं आहे. 

कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडल्याने सांगलीची जागा आपल्याला मिळावी असा आग्रह ठाकरेंनी धरला होता. त्यानुसार जागावाटपात ती जागा ठाकरेंना मिळाली देखील. मात्र, तेथील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांनाच तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी देखील केली. पण त्यांच्या पदरी निराशा आली.

असं असताना काल (15 एप्रिल) विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केला तर दुसरा अर्ज हा काँग्रेस पक्षाचा नावाने भरला आहे. विशाल पाटील यांनी यावेळी असा विश्वासही व्यक्त केला की, 19 एप्रिलपर्यंत काँग्रेस त्यांना एबी फॉर्म देईल आणि त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल.

दरम्यान, याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरे हे मात्र संतापलेले दिसून आले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना विशाल पाटलांच्या उमेदवारी अर्जावरून जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एक प्रकारे काँग्रेसलाच इशारा दिला. 'आता जर कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर त्या- त्या पक्षाची जबाबदारी आहे. ते त्यांनी थांबवलं पाहिजे.' असं उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेबाबत म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.