नियम मोडणाऱ्या पोलिसाला नागरिकाने शिकवला धडा!
पुणे : खरा पंचनामा
'तुम्ही असाल कुणीही, पुण्यात सगळे सारखेच', म्हणत पुणेकरांच्या शिस्तीचे दाखले देणारी एक पोस्ट सध्या ऑनलाईन चर्चेत आली आहे. स्वतः पोलिसांनी गाडी चालवताना हेल्मेट न घातल्याने त्यांना दंड ठोठावून पुण्याच्या वाहतूक पोलीस विभागाने सामान वागणुकीचा दाखला दिला आहे.
एका सतर्क नागरिकाने पुणे वाहतूक पोलिसांना टॅग करून नियमभंग करणाऱ्या पोलिसांचा फोटो X वर पोस्ट केला होता तसेच यामध्ये संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. या पोस्टला प्रतिसाद देताना पोलिसांनी ई- चलनाचा फोटो दाखवून कारवाई केल्याची माहिती दिली आहे.
युजरच्या माहितीनुसार, हा फोटो गुरुवारी दुपारी कुंभारवाडा सिग्नलवर काढण्यात आला होता. 'पुणे पोलिस आयुक्तांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. पण पोलिसच नियम पाळत नाहीत, मग सर्वसामान्य नागरिक नियम कसे पाळणार?' अशा आशयाची पोस्ट लिहीत संबंधित युजरने ट्रॅफिक पोलिसांना अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. पोस्टला प्रतिसाद देत, वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आणि नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० रुपयांचा दंड लावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.