दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, अल्पवयीनही ताब्यात
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सांगलीतील संजयनगर, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव पोलिस ठाण्याकडील दोन्ही उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून सव्वा लाख रूपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने (वय २५, रा. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ), श्रेयस गुरूदत्त बुरूड (वय १८, रा. सांगलीवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी धामणी येथे दोघेजण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी दोन तरूण आल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने धामणी रस्त परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी धामणीतील एका अपार्टमेंटसमोर दोघेजण संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दुचाकींबाबत कसून चौकशी केली. त्यावेळी श्रेयस बुरूड याने अल्पवयीन मुलासोबत वडगाव येथील यादव कॉलेजसमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर अनिकेत माने याने त्याचा मित्र सदानंद उर्फ नण्या माने याने चोरल्याची तसेच ती वापरायला दिल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अजय बेंदरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.