सांगलीतील तरूणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक
अल्पवयीनही ताब्यात, नाजूक संबंधाचा संशय, बारा तासाच्या आत शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गणपती मंदिराजवळ झालेल्या राहुल साळुंखे या तरूणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या खुनामागे नाजूक कारण असल्याची शक्यता आहे. संशयितांकडील चौकशीनंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल. यातील संशयितांना बारा तासाच्या आत अटक करण्यात यश आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे (वय १९), भूषण संजय एडके (वय २६), अक्षय चंद्रकांत सलगरे (वय २७, तिघेही रा. गवळी गल्ली, सांगली), अभिषेक सतीश भोजणे (वय २०, रा. शामरावनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत राहुलचा जखमी मित्र तेजस प्रकाश करांडे (वय २१, रा. जामवाडी, सांगली) याने तक्रार दिली आहे.
बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका मुलीने भेटायला बोलावल्याने मृत राहुल आणि त्याचा मित्र तेजस करांडे गणपती मंदिराजवळ गेले होते. त्यावेळी संशयितांनी अचानक कोयते आणि धारदार हत्यारे घेऊन दोघांवरही हल्ला चढवला. यामध्ये राहुल याच्या पोट, पाठीवर, डोक्यात वमीर् घाव बसल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र तेजस गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. घटना घडल्यानंतर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तसेच एलसीबीचे पथक संशयितांचा शोध घेत होते.
सांगली शहरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार चौघा संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार अधिक तपास करत आहेत.
सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, विनायक शिंदे, गणेश कांबळे, गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप कुंभार, योगेश सटाले, कॅप्टन गुंडवाडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.